‘लाल सावट’ : ग्रामजीवनाची उलघाल चितारणाऱ्या, काळीज पिळवटून टाकणाऱ्या जळजळीत कथा
या संग्रहातील सर्वच कथा वर्तमान ग्रामवास्तव व शेतशिवाराशी संबंधित आहेत. उपासमार, बेरोजगारी, अपयश, अवहेलना, हेटाळणी, फसवेगिरी, राजकारण, शासन-प्रशासनाकडून होणारी अडवणूक, सावकारी, सरंजामदारी, दादागिरी या सगळ्यांनी गावगाडा वेढून टाकलेला आहे. शोषणाची पारंपरिक व आधुनिक रूप त्यात ठाण मांडून आहेत. त्यातून आलेलं तुटलेपण, विविध ताणतणाव या सगळ्यांची मांडामांड या कथा करतात.......